Saamana Editorial Video : ‘ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा…’; ‘सामना’तून आणीबाणीचं समर्थन अन् कंगनावर हल्लाबोल

Saamana Editorial Video : ‘ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा…’; ‘सामना’तून आणीबाणीचं समर्थन अन् कंगनावर हल्लाबोल

| Updated on: Jan 26, 2025 | 12:05 PM

इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणारा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला हीच इंदिरा गांधींची ताकद असल्याचे सामनातून म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनातून आणीबाणीचं समर्थन करण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीचं समर्थन करत बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणारा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला हीच इंदिरा गांधींची ताकद असल्याचे सामनातून म्हटलं आहे. “इंदिरा गांधी हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. आज जो भारत देश उभा आहे, त्याची पायाभरणी पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनीच केली. कंगना रणौत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा `इमर्जन्सी’ हा चित्रपट काढला. बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद!”,असं म्हणत संजय राऊत यांनी घणाघात केला. पुढे असेही म्हटलंय की, “कंगना रणौत हिचा `इमर्जन्सी’ हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरे झाले. खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असल्याने त्यांनी `इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवले आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून-तोडून सादर केला आहे”, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.

Published on: Jan 26, 2025 11:55 AM