Supreme Court | मोठा झटका… UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
UGC ने जे नवीन नियम बनवले होते, त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. UGC च्या नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. त्यामुळे UGC चे 2012 मधीलच नियम लागू राहणार असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.
उच्च शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभाव संपवण्यासाठी यूजीसीने नियमांमध्ये बदल केले आहेत. विद्यार्थ्यांवर धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, अपंगत्व किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव होऊ नये. विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग, अपंग विद्यार्थ्यांमधील भेदभाव थांबवला जावा. तसेच, उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वांसाठी समानता वाढवावी. यासाठी हे बदल करण्यात आले, मात्र UGC ने जे नवीन नियम बनवले होते, त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. UGC च्या नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. त्यामुळे UGC चे 2012 मधीलच नियम लागू राहणार असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.
Published on: Jan 29, 2026 02:34 PM
