Ajit Pawar : ताई – दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजित पवारांची टोलेबाजी

Ajit Pawar : ताई – दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजित पवारांची टोलेबाजी

| Updated on: Apr 10, 2025 | 12:38 PM

Ajit Pawar - Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पुण्यात केलेल्या उपोषणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. आमदार खासदारांना देखील 5 कोटींचा निधी दिला जातो. रास्ता करायचा असेल तर तोच निधी देऊन करता आला असता, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. बीड जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र बनेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि उपोषण केलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा टोला मारला. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 5 कोटीमध्ये एखाद्या लोकसभा मतदारसंघातली कामं कशी होतील? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. त्यामुळे आता ताई आणि दादांमध्ये बानेश्वरच्या रस्त्यावरून जुंपलेली बघायला मिळाली आहे.

Published on: Apr 10, 2025 12:38 PM