Dr. B. R. Ambedkar Jayanti : खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

Dr. B. R. Ambedkar Jayanti : खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

| Updated on: Apr 14, 2025 | 9:29 AM

MP Supriya Sule On Chaityabhoomi : खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर भीमसैनिकांनी अभिवादनासाठी गर्दी केलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आहे. याच निमित्त आज राज्यात सगळीकडे जोरदार जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. जयंतीनिमित्त मुंबईच्या चैत्यभूमीवर देखील भीमसैनिक काल रात्रीपासूनच दाखल व्हायला सुरुवात झाली होती. या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते देखील याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

Published on: Apr 14, 2025 09:29 AM