Supriya Sule : कडक ऊन, डोक्यावर पदर अन् ठिय्या आंदोलनावर ठाम; सुप्रिया सुळे तीन तासांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून
Supriya Sule Protest For Baneshwar Road : भोर तालुक्यातील रस्त्या संदर्भात सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन करत आहेत. कडक उन्हात त्यांच हे आंदोलन सुरू आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या 3 तासांपासून सुप्रिया सुळे या कडक तापत्या उन्हात ठिय्या आंदोलन करत आहेत. भोर तालुक्यातील रस्त्या संदर्भात सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन करत आहेत.
भोर येथील बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बनेश्वर देवस्थानाला जाणाऱ्या भाविकांचे हाल होत आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा रास्ता तत्काळ दुरुस्थ करण्याची मागणी होत आहे. याच संदर्भात आज खासदार सुप्रिया सुळे या ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. भर उन्हात सुप्रिया सुळे या आंदोलनाला बसलेल्या आहेत. ऊन तापत असताना अद्यापही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आम्ही शिवभक्त आहे. आमच्या बनेश्वर मंदिरासाठी आम्ही कितीही वेळ उन्हात बसायला तयार आहे. महात्मा गांधी आणि विनोबाजींची मी भक्त आहे. मी त्याच संस्कारात वाढलेली आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आमच्या बानेश्वर मंदिराला आणि तिथल्या भक्तांना न्याय मिळेल यासाठी कितीही ऊन असलं तरी बसायची माझी तयारी आहे. बाकी सगळी पांडुरंगाची इच्छा असेल’, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.
