Suresh Dhas : सुपेकर 300 कोटी मागतो, सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आयजी जालिंदर सुपेकर याच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.
जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी मागतो, अशी माझ्याकडे तक्रार आलेली असल्याच आमदार सुरेश धस यांनी म्हंटलं. हगवणेचा नातेवाईक असलेल्या सुपेकरच्या विरोधात माझ्याकडे अनेक तक्रारी आलेल्या असल्याचं धर म्हणालेत. हगवणे जर बाहेर आले तर लोक त्यांना शेण मारतील अशी त्यांनी म्हंटलं.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे यांचा नातेवाईक असलेला विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर याच्या नावाने हगवणे कुटुंब सुनांना धमकावत असल्याचं उघड झालं आहे. त्यांच्यावर हगवणे बंधुंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणे आणि वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करु नये, यासाठी पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांना पदनावत करण्यात आलं. यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढवणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे.
