Sushma Andhare : डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
Sushma Andhare On Dr. Ghaisas Clean Chit : पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य करताना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा उपरोधक टोला लगावला आहे.
डॉक्टर घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलेला आहे. राज्यात गरिबांच्या जगण्याची काहीच किंमत नाही, असंही अंधारे यांनी म्हंटलं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य करताना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा उपरोधक टोला लगावला आहे. या प्रकरणी सासून रुग्णालयाने दिलेल्या अहवालात डॉ. घैसास यांना क्लीनचीट मिळाली आहे. त्यावर अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Published on: Apr 18, 2025 05:02 PM
