Exclusive | काबुलमधील स्थिती सुधारतेय, तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा; tv9 ला Exclusive Interview

| Updated on: Aug 28, 2021 | 11:58 PM

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने TV9 भारतवर्षला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. काबुल विमानतळावर भीषण बॉम्ब स्फोट झालाय. जिथे विदेशी सुरक्षा होती तिथे बॉम्ब स्फोट झाले. काबुलमधील स्थिती आता सुधारत असल्याचा दावाही शाहीन याने केलाय.

Follow us on

अफगाणीस्तानातील काबुल विमानतळावर झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या मालिकेनंतर तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने TV9 भारतवर्षला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. काबुल विमानतळावर भीषण बॉम्ब स्फोट झालाय. जिथे विदेशी सुरक्षा होती तिथे बॉम्ब स्फोट झाले. काबुलमधील स्थिती आता सुधारत असल्याचा दावाही शाहीन याने केलाय. तसंच त्याने अमेरिकेवर आरोप करताना दहशतवाद्यांच्या रस्त्यावर आपली सुरक्षा नाही असं स्पष्ट केलंय.

अफगाणिस्तानवर असलेला विदेशी कब्जा संपताच आयएसआयएस संपेल असा दावाही सुहैल शाहीन याने केलाय. तसंच आयएसआयएसची मूळं अफगाणिस्तानात रुजू दिली जाणार नाहीत. त्यावर लवकरच ताबा मिळवला जाईल. आयएसआयएसचे लोक अफगाणी नाहीत. हे बाहेरचे लोक आहेत, असा दावाही शाहीन याने केला आहे. तसंच अफगाणिस्तानात लवकरच सत्ता बदलाची घोषणा केली जाईल असंही शाहीन याने मुलाखतीत म्हटलंय. आम्ही रणनिती शेवटच्या टप्प्यात आहे. याविषयी सर्व नेत्यांशी चर्चा केली जाईल आणि त्यांच्याकडू सल्ला घेतला जाईल. आम्ही सर्व नेत्यांची चर्चा करुन सत्ता स्थापन करु इच्छित असल्याचं शाहीन याने सांगितलं.