Taliye Landslide | तळीयेत दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Taliye Landslide | तळीयेत दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 5:50 PM

महाडच्या तळीये मधलीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली दबलं गेलं आहे.

दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता. समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. त्यामुळे गावातील लोक घराबाहेर आले आणि ते दुसऱ्या डोंगराच्या बाजूला आडोशाला उभे राहिले. पण त्यांना काय माहीत काळ इथेच लपून बसला. जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे राहिले, त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगडं पडली, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. सर्व गेले. घरेही जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण परिसरात चिखल झाला होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.