Hindi imposition : आता समितीवरून वाद, हिंदी नकोच… ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा अन् सरकारचाही नवा GR, काय म्हटलंय त्यात?

Hindi imposition : आता समितीवरून वाद, हिंदी नकोच… ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा अन् सरकारचाही नवा GR, काय म्हटलंय त्यात?

| Updated on: Jul 03, 2025 | 8:52 AM

ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सोबतच पाहणी सुद्धा करण्यात आली. पण दुसरीकडे त्रिभाषा सूत्रासाठी सरकारने सुद्धा समितीचा नवा जीआर जारी केला आहे. त्यामुळे भाषेवरून वाद कायम आहे.

5 तारखेच्या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोम सभागृहाची पाहणी ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्रितपणे केली. अनिल परब, बाळा नांदगावकरांनी पहाणी करत मेळाव्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. एकीकडे ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे सरकारने हिंदी सक्तीचे जुने दोन्ही जीर रद्द केल्यानंतर नरेंद्र जाधवांची नवी समिती स्थापन केली. त्याचा नवा जीआर सरकारने काढला. त्रिभाषा सूत्रानुसार जाधव तीन महिन्यात जो अहवाल देतील त्यानुसार कुणाच्याही दबावाला बळी न पडता पुढचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हंटलंय. तर दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित आलेत आणि या मेळाव्याला हिंदी विरुद्ध मराठी अशी किनार असली तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या ॲंगलने दोन्ही भावांकडे पाहिलं जात आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही भावांची ताकद दाखवण्यासाठी गर्दीची तुलना वरळी डोमच्याच शेजारी असलेल्या समुद्राशी करणं सुरू झालाय. बघा कोण काय म्हणाले?

Published on: Jul 03, 2025 08:52 AM