Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा 5 जुलैचा एकत्रित मोर्चा कसा ठरला? राज ठाकरेंचा राऊतांना फोन अन्…

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा 5 जुलैचा एकत्रित मोर्चा कसा ठरला? राज ठाकरेंचा राऊतांना फोन अन्…

| Updated on: Jun 27, 2025 | 5:46 PM

हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं राऊतांनी ट्वीट केले. ठाकरे बंधूंचा एक फोटो देखील त्यांनी ट्वीट केला आहे. बघा नेमकं काय म्हणाले राऊत?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला मुंबईमध्ये एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचा हिंदी भाषेच्या मुद्द्याच्या विरोधामध्ये एकच मोर्चा निघणार आहे. मोर्चासाठी राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला. राज ठाकरे म्हणाले, ‘मी 6 तारखेची घोषणा केली आणि उद्धव ठाकरेंनी 7 तारखेच्या मोर्चाची घोषणा केली आहे. त्यामुळे मराठीसाठी दोन मोर्च वेगळे निघणं बरोबर दिसत नाही’, असं राज ठाकरे राऊतांना म्हणाले.

संजय राऊतांनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंच्या कानावर घातला. त्यावर मराठी माणसाचं ऐक्य दिसण गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण 6 तारखेला आषाढी एकादशी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी 7 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं किंवा राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलून 5 करावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंचा हा निरोप संजय राऊतांनी राज ठाकरेंना सांगितला त्यावर राज ठाकरेंनी तात्काळ होकार दिला. राज ठाकरेंनी मोर्चांची तारीख बदलून 5 जुलै अशी केली

Published on: Jun 27, 2025 05:45 PM