शिंदे-फडणवीस सरकार हे ‘चार दिन की चांदणी’, प्रियंका चतुर्वेदी यांनी डिवचले

शिंदे-फडणवीस सरकार हे ‘चार दिन की चांदणी’, प्रियंका चतुर्वेदी यांनी डिवचले

| Updated on: Jan 30, 2023 | 11:54 AM

शिवसेना पक्ष कधीही गद्दारांचा होणार नाही, काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?

केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हावर निर्णय येण्याची शक्यता आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून लेखी उत्तर सादर करून युक्तीवाद पूर्ण झाला आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच राहणार आहे. सर्वाधिक पुरावे ठाकरे गटाकडून जमा करण्यात आले आहे. असे असतानाही एका रात्रीत शिंदे गट आम्हीच शिवसेना असल्याचे म्हणताय तर ते संविधानाच्या विरोधात असून ते सत्ता आणि पैशांच्या जोरावर बोलत असल्याची टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. तसेच शिंदे गट हा गद्दारांचा असून ५० खोक्यांच्या जोरावर सगळं सुरू आहे. पण शिंदे गटाला असलेला सत्तेचा माज आणि ५० खोके लवकरच संपतील. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कधीही गद्दारांची होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Published on: Jan 30, 2023 11:54 AM