ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार, 8 आमदार शिंदे गटात येणार? प्रतापराव जाधव यांचा खळबळ जनक दावा
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार, 8 आमदार शिंदे गटात येणार असल्याचा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
Prataprao Jadhav : ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार, 8 आमदार शिंदे गटात येणार असल्याचा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केला आहे. ठाकरे गटातील आमदार हे वैयक्तिक किंवा स्थानिक राजकीय परिस्थितीला धरून त्या ठिकाणी थांबले आहेत. आता निवडणुका येतील त्यावेळी 15 पैकी 8 आमदार आणि 3 खासदार निवडणुकीच्या आधी शिंदे गटात येतील असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
Published on: Nov 22, 2022 12:49 PM
