Sanjay Raut : ठाकरे बंधूंचं ठरलं…महापालिका निवडणुकांसंदर्भात संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut : ठाकरे बंधूंचं ठरलं…महापालिका निवडणुकांसंदर्भात संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 15, 2025 | 4:23 PM

घोडा मैदानात खूप लांब आहे. 20 वर्ष त्यांना राज ठाकरे आणि मनसे आठवली नाही. आता संजय राऊत यांना ठाकरे बंधू आठवायला लागलेत. संजय राऊत किंवा उबाठाची एवढी हतबलता महाराष्ट्राने कधीच पाहिलेली नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

ठाकरे बंधू सगळ्या महापालिका एकत्र लढणार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. ठाकरे बंधू मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, ठाणे या महापालिका एकत्र लढणार, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू मुंबई, नाशिक, ठाण्यासह अनेक महानगरपालिका एकत्र लढणार असून तशी आमची एकमेकांशी चर्चा सुरू असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केलाय.

Published on: Aug 15, 2025 04:23 PM