Mumbai BMC Election : ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, जुन्या-नव्यांचा समन्वय

| Updated on: Dec 29, 2025 | 1:10 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेने 40 ते 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म वाटप करण्यात आले. यात अनेक माजी नगरसेवक, तरुण चेहरे आणि नेत्यांच्या मुलांना संधी मिळाली आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर होणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ही यादी जवळपास 40 ते 45 नावांची असून त्यात अनेक जुन्या नगरसेवकांसह तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपासून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली होती.

या पहिल्या यादीमध्ये रोशनी कोरे गायकवाड (प्रभाग 3), सचिन पाटील (प्रभाग 29), सुहास वाडकर (प्रभाग 40), संगीता सुतार (प्रभाग 49), अंकित प्रभू (प्रभाग 54), रोहन शिंदे (प्रभाग 57), शैलेश फणसे (प्रभाग 59), मेघना विशाल काकडे माने (प्रभाग 60), सेजल दयानंद सावंत (प्रभाग 61), झिशान चंगेज मुलतानी (प्रभाग 62), देवेंद्र बाळा आंबेडकर (प्रभाग 63), सभा हारून खान (प्रभाग 64), प्रसाद आयरे (प्रभाग 65), गीतेश राऊत (प्रभाग 89), हरी मिस्त्री (प्रभाग 95), दीपक सावंत (प्रभाग 111), श्वेता पावसकर (प्रभाग 117) आणि सकीना शेख (प्रभाग 124) या प्रमुख नावांचा समावेश आहे.

ज्या प्रभागांमध्ये वाद नाही, अशा उमेदवारांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली आहे. दादर, वरळी, शिवडी, माहिम यांसारख्या मराठी बहुल भागातील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: Dec 29, 2025 01:10 PM