कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले…
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज षण्मुखानंद हॉल येथे एक सोहळा पार पडला. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा एका मंचावर आले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना बालपणीचे अनुभव सांगितले. मला शाळेत जायचे नसले की मी माँ साहेबांच्या ऐवजी बाळासाहेबांच्या कुशीत शिरायचो. त्यावेळी बाळासाहेब एक दिवस शाळेत गेला नाही तर बिघडत नाही असे सांगायचे असा अनुभव त्यांनी सांगितले. माझे वडील आणि आजोबा यांना परिस्थितीमुळे सातवीतून शाळा सोडावी लागली होती. त्यांनी इतके कतृत्व उभे केले आहे. ते ठाकरे नाव संपवायला हे निघाले आहेत ते संपतच नाहीए. आणि त्यांचे आम्ही वारसदार मग तुम्ही त्याला घराणेशाही म्हणा.मला त्या घराणेशाहीचा आणि परंपरेचा अभिमान असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,’ महाराष्ट्राला मराठी माणसांना गद्दारीचा शाप आहे. गद्दारी जर झाली नसती तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलला असतात. एखाद्या झाडांवर अनेक पक्षी मोठे होतात.अनेक पिढ्या पोसल्या जातात काही साप देखील असतात. कंत्राटदार येऊन झाडाच्या मुळावर घाव घालतो. कारण त्याला खाण खोदायची असते. तेव्हा हे पक्षी झाला विचारात दादा तुला यातना होत असतील ना? तेव्हा झाडे म्हणाले मला दु:ख त्याचे नाही, परंतू कुऱ्हाडीचा जो दांडा आहे तो माझ्याच लाकडाचा आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झाला आहे. मुळावर वार करण्यासाठी हे दोन व्यापारी आले आहेत. आपल्याला मुंबईत जो विजय मिळाला आहे. त्यासाठी देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे नाव पुसून टाकणार होते. हे ठाकरे नावाचे झाड तोडायचे का आहे ? तर यांना वेगळ्या कारणासाठी महाराष्ट्र पादाक्रांत करायचा आहे अशी टीका यावेळी ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की यंदाच्या निवडणूकीत तर मुंबईतही पैसे वाटण्यात आल्याच्या तक्रारी मला मिळाल्या आहेत. अक्षरश: दाराच्या फटीतून पैसे भरलेले लिफाफे फेकले गेले. मत विकत घ्याल मन कसे विकत घ्याल ? जीवंत मने आजही माझ्या सोबत आहेत. हे तुम्ही दाखवुन दिले. त्यांना तुम्ही रोखलेत तुमचे आभार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
