माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू, सांगली पालिका निवडणूकीच्या रिंगणात

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू, सांगली पालिका निवडणूकीच्या रिंगणात

| Updated on: Dec 27, 2025 | 5:18 PM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा पणतू हर्षवर्धन पाटील यांनी सांगलीतील पालिका प्रभाग ११ मधून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील हे प्रभाग क्रमांक ११ मधून सांगली महापालिकेच्या रिंगणात उतरले आहेत. स्वर्गीय वसंतदादा पाटील चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यांचे शिक्षण कमी असूनही त्यांना महाराष्ट्र आणि देशाला दिशा देण्याचे काम केले होत.स्वांतत्र्य लढ्यात सहभाग घेताना त्यांना सांगली जेल फोडून पलायन केले होते. अशा वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील आता काँग्रेसच्या तिकीटावर सांगलीच्या प्रभाग क्रमांक ११ मधून पालिका निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहे. त्यांना नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. काँग्रेसने वसंतदादा पाटील यांच्या पणतूलाच निवडणूकीतून राजकारणात आणल्याने राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना हा हादरा मानला जात आहे.

Published on: Dec 27, 2025 05:18 PM