Navneet Rana | राणा दाम्पत्याचं अमरावतीमध्ये फटाके फोडून जोरदार स्वागत

Navneet Rana | राणा दाम्पत्याचं अमरावतीमध्ये फटाके फोडून जोरदार स्वागत

| Updated on: May 28, 2022 | 8:10 PM

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे स्वागत युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने ठिक-ठिकाणी केले जाणार आहे. त्यानंतर रात्री अमरावतीच्या दसरा मैदान परिसरातील हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याकडून हनुमान चालिसा व महाआरती केली जाणार आहे.

नागपूर : खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि पती आमदार रवी राणा (Ravi Rana) हे बऱ्याच दिवसांनी दिल्लीतून नागपुरात दाखल झाले. हनुमाना चालीसा (Hanuman Chalisa) आणि त्यानंतर झालेलेली जेल, हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा यांनी दिल्ली गाठत राज्य सरकार आणि पोलिसांनी संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर आजा ते नागपुरात आले. यावेळी नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तर त्यांच्या स्वागतासाठी अमरावतीमध्ये फटाके फोडण्यात आले. यावेळी ‘जय हनुमान, जय संविधान, जय श्रीरामच्या’ घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणाणून सोडलं. माझ्या महाराष्ट्राला शनी लागला आहे तो दुर करण्यासाठी हनुमान चाळीसा पठण करत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी राणा यांनी दिली आहे.

 

Published on: May 28, 2022 08:10 PM