Vijay Shinde : वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला, खटाव तालुक्यावर शोककळा

| Updated on: May 29, 2022 | 1:21 PM

शहिद सुभेदार विजय शिंदे यांच्याच शेतात अंत्यसंस्कारासाठी चबुतरा तयार केला असून पार्थिव येताच गावातुन अंत्ययात्रा काढण्यात येईल. 

Follow us on

मुंबई : देशसेवा बजावत असताना लडाखमध्ये झालेल्या अपघातामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विसापूर खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (Vijay Shinde) यांचा समावेश आहे. खटाव तालुका दुख्खात बुडाला आहे. शहिद सुभेदार विजय शिंदे यांच्या अंतिम संस्काराची तयारी पुर्ण झाली असून विसापुर सातारा या त्याच्या गावी लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार (Funeral) होणार आहेत. विजय सर्जेराव शिंदे हे सन 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत (Military service) रुजू झाले होते. दरम्यान, शहिद सुभेदार विजय शिंदे यांच्याच शेतात अंत्यसंस्कारासाठी चबुतरा तयार केला असुन पार्थिव येताच गावातुन अंत्ययात्रा काढण्यात येईल. शहिद सुभेदार विजय शिंदे यांच्या अंतिम संस्काराची तयारी पुर्ण झाली आहे. शहिद विजय सर्जेराव शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे.