यंदा पाणीटंचाई नाही; राज्यातील धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा
गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला. परिणामी यंदा राज्यातील सर्वच विभागत पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीये. उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळा सुरू होऊनही राज्यातील धरणांमध्ये सध्या स्थितीमध्ये 67 टक्के पाणीसाठा आहे.
नागपूर : मार्च महिना सुरू होऊन, पंधरवाडा उलटला आहे. कड्याक्याचे उन पडायला सुरुवात झाली आहे. उन्हाळा (Summer) म्हटलं की अनेकदा पाणीटंचाईचा ( Water scarcity) प्रश्न समोर येतो. राज्यातील काही भागात पाणीटंचाईचा प्रश्न भीषण आहे. उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागातील महिलांना (Women) डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र यंदा हे चित्र काहीसं बदलल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला. परिणामी यंदा राज्यातील सर्वच विभागत पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीये.
