Ajit Pawar | 92 साली फूट झाली होती, भुजबळांचा एकही आमदार निवडून आला नव्हता, अजित पवार यांचा शिंदे गटाला इशारा

Ajit Pawar | 92 साली फूट झाली होती, भुजबळांचा एकही आमदार निवडून आला नव्हता, अजित पवार यांचा शिंदे गटाला इशारा

| Updated on: Sep 15, 2022 | 6:45 PM

Ajit Pawar | 1992 साली भुजबळांनी बंड केले खरे, पण त्यांचा त्यावेळी एकही आमदार निवडून आला नव्हता, अशी आठवण करुन देत अजित पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

Ajit Pawar | शिवसेनेत 1992 साली छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) बंड केले होते. त्याची आठवण करुन देत, भुजबळांनी बंड केले खरे, पण त्यांचा त्यावेळी एकही आमदार निवडून आला नव्हता, अशी आठवण अजित पवार यांनी शिंदे गटाला करुन दिली. जनतेने बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान केले होते. शिवसेनेला पाहून मतदान केल्याचे त्यावेळी जनतेने सांगितले. यावेळी शिवसेनेत झालेल्या बंडाच्या अनुषंगाने त्यांनी मुद्दामहून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोरांना हा इशारा दिला. जनता या बंडखोर आमदारांना पुन्हा निवडून देणार नाही. त्यावेळी जे घडले, ते चित्र पुन्हा दिसून येईल, असा गर्भित इशारा पवार यांनी दिला.

नाशिक-औरंगाबादचे आमदार गारद

छगन भुजबळ यांचे बंड साधे नव्हते. त्यांच्यासोबत 17-18 आमदार होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकात हे सर्व आमदार भूईसपाट झाले. ते सपशेल पडले. नाशिक आणि औरंगाबाद पट्यातील ही आमदार पुन्हा निवडून आली नाहीत, अशी आठवण त्यांनी करुन दिली. भुजबळांना त्यानंतर शरद पवार यांनी विधान परिषदेवर उमेदवारी दिली. नंतर येवल्यातून निवडून आणल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Sep 15, 2022 06:45 PM