Tiger Memon : दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत

Tiger Memon : दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत

| Updated on: Apr 02, 2025 | 5:08 PM

Tiger Memon Property Seized : साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहीम याचा उजवा हात असलेला  टायगर मेमन हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टाडा कोर्टाकडून त्याच्यावर मोठी करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहीम याचा उजवा हात असलेला  टायगर मेमन हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टायगर मेमनची मुंबईतली संपत्ती जप्त करून आता केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश टाडा कोर्टाकडून काढण्यात आलेला आहे. माहीममध्ये असलेल्या अलहुसेनी इमारतीत मेमनचा एक फ्लॅट होता. याच्या संदर्भातच टाडा न्यायालयाने आता हा महत्वाचा आदेश दिलेला आहे.

मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित टायगर मेमन, त्याचा भाऊ याकुब मेमन आणि त्याचा परिवाराशी संबंधित 14 अचल संपत्ती जप्त करून केंद्र सरकारला देण्याचे आदेश टाडा कोर्टाने दिल्याचं बोललं जातं आहे. यात मुंबईच्या उच्चभ्रू भागात दुकानं, फ्लॅट, कार्यालय आणि रिकामे प्लॉट सुद्धा आहे. 1994मध्ये ही सर्व संपत्ती जप्त करण्यात आलेली होती. मेमन परिवाराने ही संपत्ती तस्करी आणि बेकायदा कारवाईतून मिळवली असल्याचा दावा कोर्टात केंद्र सरकारने केला होता. आता ही सगळी संपत्ती केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Published on: Apr 02, 2025 05:08 PM