Sanjay Raut | टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर संजय राऊतांचा पलटवार

| Updated on: Feb 16, 2026 | 11:50 AM

महाराष्ट्रात, मुंबईत तसेच अकोल्यात भाजपची सत्ता असताना टिपू सुलतान यांच्या नावाने अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले होते. तसेच, मुंबई महानगरपालिकेत विद्यमान महापौर रितू तावडे आणि अमित साटम यांच्या अनुमोदनाने टिपू सुलतान यांच्या नावाने रस्ते आणि बगीच्यांना नाव देण्यासाठी प्रस्ताव दिला होता, असा दावा राऊत यांनी केला. त्यामुळे भाजपने या प्रकरणात ‘आ बैल मुझे मार’ अशी भूमिका घेऊ नये

राज्यात सध्या टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानचे उदात्तीकरण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात, मुंबईत तसेच अकोल्यात भाजपची सत्ता असताना टिपू सुलतान यांच्या नावाने अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले होते. तसेच, मुंबई महानगरपालिकेत विद्यमान महापौर रितू तावडे आणि अमित साटम यांच्या अनुमोदनाने टिपू सुलतान यांच्या नावाने रस्ते आणि बगीच्यांना नाव देण्यासाठी प्रस्ताव दिला होता, असा दावा राऊत यांनी केला. त्यामुळे भाजपने या प्रकरणात ‘आ बैल मुझे मार’ अशी भूमिका घेऊ नये आणि महाराष्ट्राचे वातावरण बिघडवू नये, असे वक्तव्य करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Published on: Feb 16, 2026 11:50 AM