Devendra Fadnavis Speech | फडणवीसांनी सांगितलं स्वत:चं वजन

| Updated on: May 15, 2022 | 10:33 PM

मी लपवत नाही, आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा 128 किलो होतं.

Follow us on

मुंबई : मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जोरदार टीका आणि आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील मैदानावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. ते म्हणाले, उद्धवजी म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे बघा. मी लपवत नाही, आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी (Babri) पाडायला गेलो होतो तेव्हा 128 किलो होतं. पण उद्धवजींना ही भाषा नाही समजत. त्यांना कळणाऱ्या भाषेत सांगतो की, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी कराल. पण हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्यात मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालाय. वजनदार लोकांच्या नादी लागू नका’,असा जोरदार पलटवार फडणवीस यांनी केला.