विधिमंडळाचा आजचा चौथा दिवस, कोणता मुद्दा सभागृहात गाजणार? यासह जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या बातम्या
VIDEO | विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक असून संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या चर्चेची शक्यता
मुंबई : विधिमंडळाचा आजचा चौथा दिवस असून राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत. विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक असून संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या चर्चेची शक्यता आहे. भाजपचा बालेकिल्ला २८ वर्षानंतर ढासळला, काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी होऊन त्यांनी कसब्यात भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढतीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांची ३६ हजार ७० मतांनी विजयी तर नाना काटे यांच्यासह राहुल कलाटे यांचा दारूण पराभव झाला आहे. कसब्यातील विजय महाविकास आघाडीचा नाही. रविंद्र धंगेकर यांना लोकांची नैसर्गिक सहानुभूती मिळाली असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासह जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या घडामोडी…
Published on: Mar 03, 2023 07:32 AM
