Maharashtra Breaking News Live : आता औरंगाबाद महापालिकाऐवजी छत्रपती संभाजी नगर महापालिका म्हणा; पालिकेकडून नावात बदल

| Updated on: Mar 04, 2023 | 6:03 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : आता औरंगाबाद महापालिकाऐवजी छत्रपती संभाजी नगर महापालिका म्हणा; पालिकेकडून नावात बदल
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कसब्यातील विजयानंतर महाविकास आघाडीत जोश निर्माण झाला आहे. आता पुढील निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीने हालचाली सुरू केल्या आहेत. तर पूर्वेकडील राज्य मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Mar 2023 05:10 PM (IST)

    अमिताभ बच्चन यांनी शेअर बाजारातून केली कमाई

    वायर तयार करणाऱ्या कंपनीने मिळवून दिला फायदा

    बिग बी यांना मिळाला जोरदार रिटर्न, 5 वर्षांत मिळवला 5 पट परतावा

    स्मॉल कॅप कंपनीची सूसाट धाव, बिग बी यांचा मोठा फायदा, वाचा बातमी 

  • 03 Mar 2023 04:19 PM (IST)

    पनवेल मधील बाजारपेठ होळी व धूलिवंदनसाठी सजल्या आहेत

    पनवेल : बाजारपेठेत विविध रंग व आकर्षक अशा पिचकाऱ्या आल्या आहेत,

    विविध रंगाने बाजारपेठ या सजल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे,

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रंग व पिचकऱ्या यांच्या दरात देखील वाढ झाल्याचं दिसत आहे.

  • 03 Mar 2023 04:09 PM (IST)

    अपघातात तरुण जखमी

    बुलढाण्यातील वरवट बकाल - जळगाव जामोद मार्गावर पुणे जळगाव ट्रॅव्हल्सने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. अजय गणेश सालफळे असे त्याचे नाव आहे.

  • 03 Mar 2023 03:50 PM (IST)

    उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

    उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

    शासकीय भूखंडावरील अतिक्रमणाची तक्रार केल्यानं मारहाण

    मारहाण करणाराही मनसे वाहतूक सेनेचाच पदाधिकारी

    मारहाणीची घटना सीसीटीव्हीत झाली कैद

  • 03 Mar 2023 03:13 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : कंपनीला आग

    वाळूज एमआयडीसीत पुठ्ठा बनवणाऱ्या कंपनीला आग

    अनिल पॅकेजिंग या पुठ्ठा बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

    अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेचार तासात आग आणली आटोक्यात

    आगीत कंपनीचे 50 लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही

  • 03 Mar 2023 02:33 PM (IST)

    नाशिकमध्ये मनसेच्या वतीने निषेध आंदोलन

    मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचा केला निषेध

    या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी हातात घेतले दंडुके

  • 03 Mar 2023 02:06 PM (IST)

    Rohit sharma : 'आम्ही तुम्हाला पाकिस्तानसारखं...', स्वत:च्या पराभवाबद्दल बोलताना रोहित मध्येच पाकवर का घसरला?

    Rohit sharma : पत्रकार परिषदेत नेमकं झालं काय? वाचा सविस्तर.....

  • 03 Mar 2023 02:02 PM (IST)

    काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात

    सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू

    सोनिया गांधी यांना ताप आल्याची माहिती

    सोनिया यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

  • 03 Mar 2023 01:56 PM (IST)

    नवी दिल्ली: राहुल गांधी हक्कभंग खटला प्रकरण

    विशेषाधिकार समितीने भाजप खासदार निशिकांत दुबे यांना बोलावले

    निशिकांत दुबे समितीसमोर आपली बाजू मांडणार

    विशेषाधिकार समितीची बैठक 14 मार्च रोजी होणार

    लोकसभेत 7 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर अनेक आरोप केले होते

    त्याच दिवशी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्यावर नोटीस न देता बिनबुडाचे आरोप करणे आणि त्यांच्या बाजूने पुरावे न दिल्याबद्दल विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती

    राहुल गांधी यांनी यापूर्वीच हक्कभंग बाबत समितीकडे आपलं लेखी म्हणणं पाठवल्याची माहिती

  • 03 Mar 2023 01:54 PM (IST)

    नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात

    सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू

    सोनिया गांधी यांना ताप आल्याची माहिती

    सोनिया यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

    रात्रीपासून ताप आल्याने डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू

  • 03 Mar 2023 01:20 PM (IST)

    औरंगाबाद महापालिकेनेही केला नावात बदल

    औरंगाबाद महापालिका ऐवजी आता छत्रपती संभाजी नगर महापालिका

    औरंगाबाद महापालिका प्रशासनाचे सर्व विभाग प्रमुखांना पत्र

    नाव बदलण्यासाठी पत्र काढून दिल्या सूचना

  • 03 Mar 2023 01:04 PM (IST)

    खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोरचं काँग्रेस कार्यकर्त्यांची बँनरबाजी

    खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोरचं काँग्रेस कार्यकर्त्यांची बँनरबाजी

    कसबा गणपतीसमोर समोर असलेल्या बापटांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोरचं बँनरबाजी

    चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या हु इज धंगेकर प्रश्नाला दीस इज धंगेकर या पोस्करच्या माध्यमातूनचं प्रत्युत्तर

    बापटांच्या कार्यालयासमोरचं लावला बँनर

  • 03 Mar 2023 01:03 PM (IST)

    मुक्ताईनगर राष्ट्रवादीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जनआक्रोश मोर्चा सुरू

    मुक्ताईनगर राष्ट्रवादीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जनआक्रोश मोर्चा सुरू

    मोर्चात हातात खोके, केळी, कांद्याचे हार घालून आंदोलन करते सहभागी

    मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला राष्ट्रवादीचे जिल्ह्या भरातील कार्यकर्ते सहभागी

    एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला मोर्चा

    मोर्चात लक्ष वेधण्यासाठी प्रतिमा साकारण्यात आल्या मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरु

  • 03 Mar 2023 12:43 PM (IST)

    नितीन गडकरी यांच्या नावाने दिशाभूल करणारे मॅसेज व्हायरल

    कसबापेठ निकालाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने दिशाभूल करणारे मॅसेज व्हायरल
    नितीन गडकरी यांच्याकडून नागपूर पोलीसांत तक्रार
    खोट्या आणि दिशाभूल करणारे मॅसेज व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी
  • 03 Mar 2023 12:35 PM (IST)

    नवी मुंबईतील सिवूड मध्ये एका कारने वाहनाना दिली धडक.

    चार मोटारसायकल आणि 2 रिक्षाना दिली जोरदार धडक.

    अपघातात एक रिक्षाचालक जखमी.

    जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु.

    ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक माहिती

  • 03 Mar 2023 12:05 PM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    -या निवडणुकीमध्ये महाविकास आघडीचे बंडखोर अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त

    -निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते मात्र आज झालेल्या मतमोजणी मध्ये राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाले आहेत मतदारसंघांमध्ये दोन लाख 87 हजार मतदान झाले यापैकी 47 हजार 833 मते कोणत्याही उमेदवाराला मिळणे आवश्यक होते

    -ही मते न मिळाल्यामुळे 28 पैकी 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.यामध्ये राहुल कलाटेंचा देखील समावेश आहे

  • 03 Mar 2023 11:22 AM (IST)

    खासदार संजय राऊतांचा पुण्यातील शिवसैनिकांना फोन

    फोन करुन शिवसैनिकांचे मानले आभार

    काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांच्या विजयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं मोठं योगदान

    संजय राऊतांनी कार्यकर्त्यांचं केलं अभिनंदन

    पुढील आठवड्यात पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलं जाणार

  • 03 Mar 2023 11:19 AM (IST)

    नागपुरात ईडीचा छापा

    उद्योगपती अग्रवाल यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी ईडीचा छापा

    पहाटेपासून सुरू आहे ईडीचे सर्च ऑपरेशन

    बेनामी संपत्ती प्रकरणी ईडीने छापा टाकल्याची माहिती

    रामू अग्रवालसह इतर व्यापाऱ्यांवरसुद्धा कारवाई

    गौरी हाईटस या रामदासपेठ परिसरातील बिल्डिंगमध्ये टाकण्यात आला छापा

  • 03 Mar 2023 11:15 AM (IST)

    नागपूर अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांची मोठी कारवाई

    1 किलो 911 ग्राम मेफेड्रोन (एमडी) जप्त

    अंदाजे 1 कोटी 91 लाख रुपये 10 हजार रुपयांचा अंमली पदार्थ (एमडी) जप्त

    सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाई

    कुणाल गबने आणि गौरव कालेश्वरवार यांच्या ताब्यातून जप्त केले एमडी

    अंमली पदार्थ विरोधी पथकाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

    होळीच्या निमित्ताने शहरात केली जाणार होती ड्रग्ज खुराक

  • 03 Mar 2023 11:10 AM (IST)

    IND vs AUS 3rd Test Result : फिरकीच्या जाळ्यात टीम इंडियाचा 'गेम', ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

    IND vs AUS 3rd Test Result : 'त्या' दोघांमुळे ऑस्ट्रेलियाने जिंकला तिसरा कसोटी सामना. वाचा सविस्तर.....

  • 03 Mar 2023 11:10 AM (IST)

    गोसेखुर्दचे पाणी पोहोचले घोडेझरी व खराशी तलावात

    - गोसेखुर्दचे पाणी पोहोचले घोडेझरी व खराशी तलावात.

    - 33 वर्षांच्या कार्यकाळानंतर पालांदूर परिसरातील मन्हेगाव वितरिका अंतर्गत विहीरगाव टेलपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर घोडेझरी व खराशी तलावात पाणी सोडण्यात आले.

    12 पैकी 3 पंप सुरू करण्यात आले आहेत दरम्यान हे फक्त प्रायोगीत तत्वावर सूरु असून वितरीकैचे काम पूर्ण झाल्यावर पुढील वर्षी पासून पाणी मिळणार आहे.

    -,या भागातील शेती आता सुजलाम सुफलाम होणार आहे.

  • 03 Mar 2023 10:52 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरात शासकीय अस्थापनांची नावे बदलायला सुरुवात

    मध्यवर्ती बस स्थानकाचे नाव बदलले

    औरंगाबाद ऐवजी आता मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजी नगर असा बदल

    शहरात सर्वात प्रथम बस स्थानकाचे बदलले नाव

    इतरही शासकीय कार्यालयांची लवकरच बदलली जाणार नावे

  • 03 Mar 2023 10:36 AM (IST)

    IND vs AUS 3rd Test : टीम इंडिया आज मॅच हरली, तर एका माणसाची नोकरी जाणार?

    IND vs AUS 3rd Test : टीम इंडिया हरली, तर त्याच्या नोकरीवर का गदा येणार? त्याची चूक इतकी मोठी आहे का? वाचा सविस्तर....

  • 03 Mar 2023 10:35 AM (IST)

    IND vs AUS 3rd Test : Ashiwn सोबतच नेहमी असं का होतं? सुनील गावस्करांचा रोहित शर्माला प्रश्न

    IND vs AUS 3rd Test : रोहित शर्माने अश्विनसोबत असं का केलं? गावस्कारांना ती गोष्ट खटकली, त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. वाचा सविस्तर.....

  • 03 Mar 2023 10:17 AM (IST)

    हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचा मोठा निर्णय

    कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी टाकले हे पाऊल

    हिंडनबर्गसारखा पहिल्यांदाच मोठा तडाखा

    समूह अजूनही या वादळातून सावरला नाही

    पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी समूह सक्रीय, वाचा बातमी 

  • 03 Mar 2023 09:56 AM (IST)

    माजी नगरसेवकाने पालिका आयुक्तांच्या केबिन समोर फोडले मडके

    - सोलापूर महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पालिका आयुक्तांच्या केबिन समोर फोडले मडके

    - पाणी प्रश्नावरून भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील आक्रमक

    - सोलापूर शहरासह प्रभागात वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाची आक्रमक भूमिका

    - प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या केबिन समोर ठिय्या आंदोलन करत मटके फोडत पालिकेच्या कारभाराचा निषेध केलाय.

  • 03 Mar 2023 09:51 AM (IST)

    चंद्रपूर : भद्रावतीच्या आयुध निर्माणी परिसरात बिबट्या जेरबंद

    २० फेब्रुवारी रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला

    सेक्टर 5 मध्ये त्यानंतर 3 पिंजरे लावत बिबट्याचा चालविला शोध

    आज यापैकी एका पिंजऱ्यात अडकला बिबट्या, बिबट्याच्या अंगावर आहे जखमा

    वनपथकाने बिबट्याला चंद्रपूर वन्यजीव शुश्रूषा केंद्रात केले रवाना

  • 03 Mar 2023 09:23 AM (IST)

    सोने-चांदी झाली स्वस्त

    गुंतवणुकदारांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

    लग्नसराईत भाव पुन्हा घसरण्याची शक्यता

    उच्चांकापेक्षा 2700 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त

    उच्चांकी भावापेक्षा चांदी 16274 रुपये प्रति किलोने स्वस्त

    बातमी वाचा या लिंकवर :  Gold Price Update News : शुक्रवारी पण सोन्यात पडझड, 10 ग्रॅम झाले इतके स्वस्त!

  • 03 Mar 2023 08:44 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात चढउतार

    तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    इंधनावरील कर कपतीचा निर्णय होणार तरी कधी?

    गेल्या महिन्यात रशियाकडील कच्चा तेलाची आयात घटली

    देशात इंधनाचे दर पुन्हा भडकणार का?  वाचा बातमी 

  • 03 Mar 2023 08:36 AM (IST)

    पुणे : फसवणुकीचा गुन्हा दाखल

    परदेशात पिझ्झा शेफची नोकरी देतो म्हणून तरुणाला 9.50 लाख रुपयांना गंडवलं

    पुण्यातील चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

    बस एजन्सी चालवणाऱ्या अनिकेत बोथरा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला

    माल्टा या ठिकाणी पाठवून बेकरीच्या दुकानात क्लिनींगचं काम दिलं

    भारतीय दूतावासाशी संपर्क करून तरुण आला परत

    चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात दिली तक्रार गुन्हा नोंद करण्यात आला

  • 03 Mar 2023 08:33 AM (IST)

    बारावीच्या परीक्षेतही कॉपीचे प्रकार

    दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये 9 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई

    आतापर्यंत 40 विद्यार्थ्यांवर भरारी पथकानं कॉपीची कारवाई केली

    फिजिक्स विषयाच्या पेपरमध्ये सर्वाधिक कॉपीची कारवाई करण्यात आली

    कालपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे

  • 03 Mar 2023 08:29 AM (IST)

    Virat kohli बरोबर करायचं होतं लग्न, आता ती 'या' महिलेसोबत थाटणार संसार

    कोण आहे ती ? वाचा सविस्तर....

  • 03 Mar 2023 08:29 AM (IST)

    IND vs AUS : 'हा' बॉलर भारताला पराभवापासून वाचवू शकतो, फक्त इंदोरमध्ये मोडावा लागेल एक दिवस जुना रेकॉर्ड

    IND vs AUS : कुठला रेकॉर्ड, कुठला बॉलर? टीम इंडियाची हार टाळू शकतो. वाचा सविस्तर....

  • 03 Mar 2023 07:55 AM (IST)

    गोळीबार करून फरार झालेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

    नाशिक : तरुणाकडून गावठी कट्टा जप्त,

    4 जानेवारी 2023 रोजी शहरातील इंदिरानगर परिसरात घडली होती घटना,

    मुंबईनाका पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल.

  • 03 Mar 2023 07:01 AM (IST)

    विद्यार्थ्यांचा नादच खुळा

    छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या विद्यार्थ्यांनी चक्क नारळ फोडून केली पेपरला सुरुवात,

    छत्रपती संभाजी नगरच्या लासुर स्टेशन येथील विद्यार्थ्यांचा प्रताप,

    बोल भवानी की जय चा जयघोष करून फोडले नारळ,

    आपले नोटपॅड बाजूला ठेवून त्याच्या शेजारी एक दगड ठेवून नारळ फोडून पेपरला केली सुरुवात; व्हिडिओ प्रचंड व्हायरल,

    काल पासून सुरू झाले दहावीचे पेपर.

  • 03 Mar 2023 06:59 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर घरकुल घोटाळ्या प्रकरणी ईडीने मागवला अहवाल

    छत्रपती संभाजीनगर : ईडीने देखील शासनाने चौकशी केलेला अहवाल आला मागवण्यात,

    पंतप्रधान घरकुल योजना राबविण्यात आली असता निविदा प्रक्रिया संशयाच्या भौर्यात,

    घरकुल योजनेच्या निविदेत घोटाळा झाल्याचा लोकप्रतिनिधी केला होता आरोप,

    नगर विकास विभागाकडून मनपा प्रशासक, आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस आली बजावण्यात.

  • 03 Mar 2023 06:58 AM (IST)

    मराठवाड्यात एक कोटी 34 लाख रुपयांची वीजचोरी उघड

    छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू,

    242 वीज मीटर मध्ये आढळून आली वीज चोरी,

    वीज चोरी प्रकरणी 1 कोटी 34 लाख 66 हजार रुपयांच्या दंडाची रक्कम आली आकारण्यात,

    वीज चोरीच्या अनुमानित वीज बिल दंडाची रक्कम भरणा न केल्यास संबंधित आवर विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश,

    छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात वीज मीटरची तपासणी.

  • 03 Mar 2023 06:23 AM (IST)

    मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलाजवळ रात्री टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू

    अपघातानंतर बस चालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

    बसमध्ये कैथे पॅसिफिक एयरलायन्सचे कर्मचारी होते आणि ताज लँड हॉटेल जात होते

    बसमध्ये असलेल्या एक महिलेला दुखावत झाली आहे, बाकीचे सर्व प्रवासी सुखरूप आहेत

    मासळी वाहक टेम्पो होता, अपघातामुळे मासळी रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती

    पोलीस गुन्हा नोंद करून पुढील तपास करत आहेत

  • 03 Mar 2023 06:20 AM (IST)

    अभिनेता शाहरुख खानच्या मन्नतमध्ये गुरुवारी दोन अनोळखी इसम घुसले

    दोघांना तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी पकडून वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले

    वांद्रे पोलिसांनी दोघांवर भादंविच्या कलम 452, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक केली

    दोन्ही संशयित आरोपी गुजरातचे आहेत

    दोघे शाहरुख खानचे फॅन्स आहेत. पोलीस गुन्हा नोंद करून पुढील तपास करत आहे

    पोलिसांनी शाहरुख खानच्या बंगल्या बाहेरची सुरक्षा वाढवली आहे

  • 03 Mar 2023 06:18 AM (IST)

    धावत्या लोकलच्या लगेज बोगीत वयोवृद्धाची हत्या

    कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान घडली घटना

    डब्यात चढताना धक्का लागल्याचा झालेल्या वादामुळे हत्या केल्याचा संशय

    कल्याण लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

  • 03 Mar 2023 06:16 AM (IST)

    संजय राऊत यांचा आज कराड दौरा

    कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसला धक्का

    दोन विद्यमान नगरसेवक, दोन माजी नगरसेवक ठाकरे गटाच्या वाटेवर

    आज घेणार खासदार संजय राऊत यांची भेट

    कराडच्या राजकारकारणात ठाकरे गटाची एन्ट्री

    विद्यमान नगरसेवक इंद्रजित गुजर, नगरसेवक माजी शहराध्यक्ष आप्पा माने यांची चव्हाण गटावर नाराजी

  • 03 Mar 2023 06:14 AM (IST)

    पोलीस भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुण मुल-मुली मुंबईत

    पोलीस भरतीसाठी मुंबई विद्यापीठात मुलांची शारीरिक चाचणी सुरू

    रात्री पासून मुंबई विद्यापीठच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर मुल आणि मुली एकत्र थांबले

    भरतीसाठी आलेल्या तरुणांसाठी कुठल्या प्रकारची सोय नसल्याने मुलांना मोठा त्रास होतोय

    जेवणाचा सोय नाही, पाण्याची सोय नाही , शौचालयाची सोय नसल्याने मुलांना खूप त्रास सहन करावा लागतोय

    मच्छरांमुळे मुले हैराण, एवढे मच्छर आहे की मुंबई विद्यापीठच्या गेटच्या बाहेर उभे राहणे अशक्य, तरी रात्रभर मुले इथे रस्त्यावर झोपले, काहींनी जागरण केलं

Published On - Mar 03,2023 6:09 AM

Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.