ST कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार नाही- Anil Parab

ST कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार नाही- Anil Parab

| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 8:46 PM

पगारवाढ, वेतनाची शाश्वती आणि नोकरीची हमी दिली तरीही कर्मचारी अडून बसले. कर्मचाऱ्यांनी आधी कामावर यावे मग चर्चा करु. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना कामावर माघारी घेतली जाणार नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली नाही त्यांनी कामावर यावे त्यानंतरच चर्चा करणार, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे जाण्याची शक्यता आहे. स्वेच्छा मरण हा आपल्याकडील कायदा नाही. ही मागणी चुकीची आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने आत्महत्या करु नये. आत्महत्या हा त्यावरचा इलाज नाही. त्याचा पगार थांबला तर कोणीही मदतीला येत नाही. कुटुंबाची वाताहत होतेय त्यामुळे असे पाऊल उचलू नये. आम्ही आतापर्यंत कामगारांच्या अनेक प्रतिनिधींना भेटलो पण ते परत येत नाहीत. सदावर्तेंना भेटलो पण ते विलीनिकरणाशिवाय काहीही बोलत नाही त्यामुळे चर्चा होत नाही. पगारवाढ, वेतनाची शाश्वती आणि नोकरीची हमी दिली तरीही कर्मचारी अडून बसले. कर्मचाऱ्यांनी आधी कामावर यावे मग चर्चा करु. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना कामावर माघारी घेतली जाणार नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली नाही त्यांनी कामावर यावे त्यानंतरच चर्चा करणार, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.