Parbhani | त्रिपुरा हिंसाचार प्रकरण, मुस्लिम बांधवांची जोरदार निदर्शने

| Updated on: Nov 12, 2021 | 10:52 PM

दंगलीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. उद्ध्वस्त झालेल्या धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करावी. हल्लेखोरांना सहकार्य करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना सेवेतून बडतर्फ करावे तसेच तेथील वकील व पत्रकारांविरुध्दचे खटले मागे घ्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Follow us on

YouTube video player

परभणी : परभणीत विविध पक्ष, संघटनांसह मुस्लिम समाजबांधवांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने त्रिपुरा राज्य सरकारला तातडीने बरखास्त करावे, धूमाकूळ घातलेल्या, घालणार्‍या तसेच कायदा व सुवस्था निर्माण करणार्‍या व्यक्ती व संस्थांविरुध्द कठोर कारवाई करावी. त्रिपुरा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. दंगलीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. उद्ध्वस्त झालेल्या धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करावी. हल्लेखोरांना सहकार्य करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना सेवेतून बडतर्फ करावे तसेच तेथील वकील व पत्रकारांविरुध्दचे खटले मागे घ्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.