Donald Trump : ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
America - China Trade War : ट्रम्प यांनी टेरिफ योजनेबाबत फेरविचार करणार असल्याचं संगत 90 दिवस या योजनेला स्थगिती दिली आहे.
टेरिफबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. चीन बाबत मात्र अमेरिकेची कठोर भूमिका ही कायम आहे. अमेरिकेने भारतावर लावलेला टेरिफ हा सध्या 10 टक्के इतकाच राहणार आहे. चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसीप्रोकल टेरिफला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे. अमेरिकेकडून चीनवर मात्र तब्बल 125 टक्के आयात शुल्क लागू करण्यात आलेला आहे.
ट्रम्प यांनी घोषणा केलेल्या टेरिफ योजनेला आता 90 दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे. बड्या देशांनी लावलेल्या तगाद्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हंटलं आहे. तसंच 75 देशांनी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी बोलावलं असल्याचं देखील ट्रम्प म्हणालेत. तर अमेरिकेने भारतावर लावलेला टेरिफ हा सध्या 10 टक्के इतकाच राहणार आहे.
Published on: Apr 10, 2025 10:19 AM
