Nagpur Winter Session: विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का? अखेर सांगूनच टाकलं… अधिवेशन वादळी ठरणार?
उदय सामंत यांनी भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करतील असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधी पक्षनेतेपदाच्या वादामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची रणनीती बैठक होणार असून, शिंदेंची शिवसेना मुंबई पालिका निवडणुकीसाठी १०० जागांवर आग्रही आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची काँग्रेस कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यात पुढील रणनीतीवर चर्चा होईल. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करतील असे मला वाटत नाही. यूबीटी शिवसेनेने केवळ पत्र दिले असले तरी, त्यांना हे पद मिळेल अशी शक्यता कमी असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे दरम्यान, उरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री आठ वाजता नागपुरातील देवगिरी निवासस्थानी सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशन आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचा आक्षेप विरोधी पक्षांनी घेतला आहे.