Udayan Raje Bhosale : गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं; उदयनराजेंची मागणी

Udayan Raje Bhosale : गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं; उदयनराजेंची मागणी

| Updated on: Apr 11, 2025 | 12:29 PM

गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं असं उदयन राजे भोसले यांनी म्हंटलं आहे.

गवर्नर हाऊसची 48 एकर जागा आहे. त्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं असं उदयन राजे भोसले यांनी म्हंटलं आहे. या स्मरकाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचं देखील यावेळी उदयनराजे म्हणाले.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे. मुंबईत अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन झाले होते. त्यावेळी मी स्वतः तिथे होतो. पण कदाचित पर्यावरणामुळे तिथे ते स्मारक करता येत नसेल. पण गव्हर्नर हाऊसची मुंबईत तब्बल 48 एकर एवढी जागा आहे. त्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करा. राज्यपालांना राहायला किती जागा लागते? 48 एकर म्हणजे काही कमी जागा नाही. ही जागा अरबी समुद्राला लागूनच आहे. तिथे स्मारक करण्याच्या मुद्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

Published on: Apr 11, 2025 12:29 PM