Uddhav Thackeray : शिवसेनेला केंद्रातही मोठा झटका, 12 खासदार शिंदे गटात सहभागी, ठाकरेंच्या शिवसेनेचं नेमकं काय होणार?

| Updated on: Jul 19, 2022 | 9:55 PM

12 खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनीच शिक्कामोर्तब केलंय. मात्र, 40 आमदारांपाठोपाठ आता 12 खासदारही शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

Follow us on

राज्यातील सत्तांतरानंतर आता केंद्रातही शिवसेनेला मोठा हादरा बसलाय. शिवसेनेचे 12 खासदार आज शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या 12 खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत आपला वेगळा गट स्थापन करण्यास मान्यता देण्याची मागणी केलीय. तसंच आपल्या गटाला बसण्यासाठी वेगळी जागा देण्याची मागणीही या खासदारांकडून करण्यात आलीय. या खासदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी 12 खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनीच शिक्कामोर्तब केलंय. मात्र, 40 आमदारांपाठोपाठ आता 12 खासदारही शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.