Shivsena UBT : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर
Udhav Thackeray News : शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या प्रवक्ते पदाच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. यात 2 मुख्य प्रवक्ते आणि सहा प्रवक्ते निवडण्यात आलेले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदाच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यात मुख्य प्रवक्तेपदी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात सुषमा अंधारे, जयश्री शेळके आणि प्रियंका चतुर्वेदी या तीन महिला नेत्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर अनिल परब, हर्षल प्रधान आणि आनंद दुबे यांची देखील शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
Published on: Apr 09, 2025 11:27 AM
