धनुष्य मिंध्यांना पेलवणार नाही, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला काय दिला इशारा?

धनुष्य मिंध्यांना पेलवणार नाही, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला काय दिला इशारा?

| Updated on: Feb 20, 2023 | 3:44 PM

VIDEO | निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, उद्धव ठाकरे थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाच इशारा देत म्हणाले...

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही. मग एवढा खर्च कशाला का करायला लावला. निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा निकाल मला मान्य नाही. हा चोरलेला धनुष्य आहे. हे शिवधनुष्य आहे. ते रावणाला पेललं नाही. ते मिंध्यांना काय पेलवणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला देण्यात आलेल्या धनुष्यबाण आणि चिन्ह याबाबत बोलताना पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ते असेही म्हणाले पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाा नाही. तसं केल्यास निवडणूक आयोगावर केस केली जाईल. त्यांना फक्त चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्याचा आणि निवडणुका घेण्याचा अधिकार आहे. पक्षांतर्गत आणि देशांतर्गत लोकशाही जिवंत आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार आहे. प्रॉपर्टी आणि इतर मालमत्तांवर हक्क सांगण्याची परवानगी देण्याचा अधिकार नाही, निवडणूक आयोग म्हणजे सुल्तान नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Published on: Feb 20, 2023 03:44 PM