उद्धव ठाकरे यांनी दिला भाजप सोबतच्या जुन्या मैत्रीचा दाखला, म्हणाले एक काळ असा होता…

उद्धव ठाकरे यांनी दिला भाजप सोबतच्या जुन्या मैत्रीचा दाखला, म्हणाले एक काळ असा होता…

| Updated on: Nov 21, 2023 | 11:39 PM

प्रत्येकामध्ये काही महत्व असत. आपण विकास विकास करतो आणि जंगल संपवून टाकतो. आपल्या घरात बिबट्या घुसला तर बातमी. मात्र, आपण त्याच्या घरात शिरतो त्याची बातमी नाही. त्याच्या घरावर आपण घर बनवतो. पण, त्याच्यासाठी घर कोण बनवेल.? निसर्ग विरोधात आपण वागतोय.

मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : कोणी तरी असा सापडला ज्याला मी प्रेरणा दिली. ऐकून आनंद वाटला. नाही तर खूप सारे असे आहेत की… माझ्यासमोर थोडी अडचण आहे. येथे एक सर्वात महत्वाचा फोटो आहे. फोटोग्राफी हा बघण्यापेक्षा काढण्यात आनंद असतो. इथे आल्यावर सगळे विचारतात की आपण वाईल्ड ग्राफ फोटोग्राफी करता का? मात्र, ही वाईल्ड लाईफ नाही. खरी वाईल्ड लाईफ शहरात आहे. मात्र, ती फोटोग्राफी लायक राहिली नाही. आपल्या शहरात जी राजकारणाची वाईड लाईफ आहे ती फोटोग्राफीच्या लायकीची नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोपऱ्यातील दोन टायगरचा एक फोटो बघून जुन्या आठवणी जिवंत झाल्या. एका जमान्यात कमळाबरोबर वाघ होता. 25 ते 30 वर्षापासून. मात्र, आता तो नाही असे म्हणत ठाकरे यांनी भाजप सोबतच्या जुन्या आठवणीचा दाखला दिला.

Published on: Nov 21, 2023 11:39 PM