‘निर्लज्ज, विश्वासघातकी…’, नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या ‘त्या’ आरोपांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा भडका
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर पद मिळतं असा आरोप नीलम गोरे यांनी केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप आनावर झाला. संजय राऊतांनी विश्वासघातकी अशी टीका केली. तर अंधारेंनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी दर्शवली.
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर केलाय आणि मर्सिडीजवरून दोन्ही शिवसेनेत भडका उडाला. संजय राऊतांनी नीलम गोऱ्हे यांना निर्लज्ज बाई म्हणत विश्वासघातकी अशी टीका केली. आता उद्धव ठाकरेंवरच मर्सिडीजचा आरोप केल्यानंतर राऊतांनी दोन पत्ते उघड केलेत. तिकीट मिळवून देण्यासाठी नीलम गोऱ्हे पैसे घेत होत्या. यासाठी नावानिशी त्यांनी आरोप केला. त्यासाठी त्यांनी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि पुणे महानगरपालिकेचे माजी गटनेते अशोक हरनावळ यांची नावे घेतली. गोऱ्हेंनी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे आणि हरनावळ यांनी राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर बोलल्यास पुरावे मिडीयासमोर आणणार, असा इशारा दिलाय. संजय राऊतांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ही तुटून पडल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेने नीलम गोऱ्हेंना चार वेळा विधानपरिषदेवर आमदार केलाय मग किती मर्सिडीज दिल्या असा थेट सवाल अंधारेंनी केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
