नीलम गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, उद्धव ठाकरेंची सेना ‘त्या’ आरोपांनंतर आक्रमक
नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनतर ठाकरे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनतर ठाकरे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन होत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून ही भूमिका घेण्यात आली आहे. नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. ‘ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होते, प्रत्येक सभेला ठाण्यात माणसे येत होती. त्यांची लोक संपूर्ण तयारी करत होते. आता उद्धव ठाकरे गटाचे लोकही समोर नाही. पण ते असताना मला हे बोलायला आवडलं असतं’, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरूनच संजय राऊत यांनी संमेलन अध्यक्षा उषा तांबेना खरमरीत पत्र लिहिले आहे. संमेलनाच्या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला, असल्याचे राऊतांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.
