Udhav Thackeray : दोन्हीबाजूला संभ्रम नाही, जी बातमी द्यायची ती.. ; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray Press Conferene : उद्धव ठाकरे यांनी आज प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मनसेसोबतच्या युतीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते होईल. एका वाक्यात सांगितलं. बाकीचे बारकावे आम्ही पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे. राज ठाकरेंसोबत युती कधी करणार या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. सुजाता शिंगाडे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उबाठा गटात प्रवेश केला. यापक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याकडून आलेल्या या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे आता ठाकरे बंधूंची युती कधी? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सुजाताताई आज आपल्या घरी आल्या आहेत. ती महत्त्वाची बातमी आहे. त्यांचा पुनरप्रवेश हा तमाम शिवसैनिकांसाठी संदेश आहे. बाकी जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते होईल. बाकीचे बारकावे आम्ही पाहत आहोत. संदेश नाही, मी बातमीच देईन तुम्हाला. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे.
