Uddhav Thackeray | महिला सुरक्षेच्या मुद्यावर राज्यात लेटर वॉर, भाजप आमदारांचं खरमरीत पत्र

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 5:09 PM

भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर, आता भाजपच्या महिला आमदारांनीही पत्र लिहून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. “सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का? असा सवाल या पत्रातून विचारला आहे. राज्यात महिला अत्याचार वाढत असताना, महिला असुरक्षित असताना दिल्लीत अधिवेशन बोलावण्याची मागणी करून राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न का करताय? असा खरमरीत सवाल या महिला आमदारांनी विचारला आहे.