Uddhav Thackeray : मनसे युतीबाबत उद्धव ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत एकच आदेश, म्हणाले..
मनासेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली. मनासे युती संदर्भात आपण सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये सांगितलं आहे. स्थानिक पातळीवर युती आघाडीबाबत आढावा घेऊन माहिती द्या, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना दिले.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदार आणि खासदारांसाठी डिनर डिप्लोमसी देखील आयोजन करण्यात आलेय. हॉटेल ताज लँडमध्ये रात्री आठ वाजता डिनर डिप्लोमसी आयोजित करण्यात आली आहे. यासह स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी मनसे सोबत कुठे युती करायची हे पक्ष ठरवेल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. युती आघाडी होऊ किंवा न होऊ सर्व जागांवर स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. भाजप हा भाडोत्री पक्ष आहे अजूनही पक्ष फोडू शकतो असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं
Published on: Jun 20, 2025 05:41 PM
