Uddhav Thackeray : अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद… उद्धव ठाकरे यांची पुन्हा शाहांसह एकनाथ शिंदेंवर जहरी टीका

| Updated on: Dec 15, 2025 | 12:23 PM

उद्धव ठाकरेंनी विरोधकांना अ‍ॅनाकोंडा आणि गांडुळाची औलाद असे संबोधत तीव्र टीका केली. मुंबई महाराष्ट्राचीच राहील, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावले, तर शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांना अ‍ॅनाकोंडा संबोधत ते मुंबई गिळायला निघाल्याचा आरोप त्यांनी केला. अ‍ॅनाकोंडावर टीका केली असता, गांडुळाची औलाद उत्तर देते, गुलाम प्रतिक्रिया देत नाही, गांडुळाने फणा काढू नये, अशा शब्दात ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असे ठामपणे सांगितले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला लुटणारा रहेमान डकैत कोण, असा सवाल विचारत विरोधकांवर पलटवार केला. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती.

Published on: Dec 15, 2025 12:23 PM