‘उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला अन्…’ बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल

‘उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला अन्…’ बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Jan 11, 2026 | 4:50 PM

हेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेतून बाहेर टाकण्याचं काम केलं आणि फडणवीसांचे पद हिसकून ह्या राज्याची अधोगती केली' अशी टीका बावनकुळेंनी ठाकरेंवर केली आहे.

टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत बोलताना शिवसेना उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव म्हणाले होते, ‘समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला आहे’ यावर प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या पद, प्रतिष्ठेला धक्का लावणारे उद्धव ठाकरे आहेत. ‘कालांतराने आता त्यांच्यात सुधारणा झाली असेल, पण हेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेतून बाहेर टाकण्याचं काम केलं आणि फडणवीसांचे पद हिसकून ह्या राज्याची अधोगती केली’ अशी टीका बावनकुळेंनी ठाकरेंवर केली आहे. ‘आता मैत्री वैगरे शब्द हे निवडणुकीसाठी वापरावे लागतात’. फडणवीसांच्या प्रचाराची धार कमी होईल असं विरोधकांना वाटतं पण ‘देवेंद्र म्हणजे डेव्हलपमेंट आहे आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र आहे’ त्यामुळे ठाकरेंच्या या प्रयत्नांना काही अर्थ नाही आहे.

Published on: Jan 11, 2026 04:50 PM