Uddhav Thackeray : कामाचा नन्नाचा पाढा अन् हिंदू मुस्लीम… उद्धव ठाकरेंचा भाजपवर सौगात-ए-मोदीवरून निशाणा

Uddhav Thackeray : कामाचा नन्नाचा पाढा अन् हिंदू मुस्लीम… उद्धव ठाकरेंचा भाजपवर सौगात-ए-मोदीवरून निशाणा

| Updated on: Oct 04, 2025 | 2:52 PM

उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाजपवर सौगात-ए-मोदीवरून निशाणा साधला. महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रितपणे लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य एकजुटीवरही भाष्य केले.

पुण्यातून बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सौगात-ए-मोदीवरून निशाणा साधला. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्यास काहीच हरकत नसल्याचे म्हटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढण्यास अनुकूल असल्याचे संकेत त्यांनी दिले.

उद्धव ठाकरे यांनी स्थानिक निवडणुकांसाठी विकास हाच मुख्य अजेंडा असावा यावर जोर दिला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, नुकसानभरपाई, भूमिपुत्रांना नोकऱ्या आणि शिक्षण हे जीवनावश्यक प्रश्न असून ते भावनिक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप विकासकामांच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे पुढे आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील शिवसेनेच्या कार्यकाळातील विकासकामे, जसे की शाळा, पाणीपुरवठा आणि कोस्टल रोडचे श्रेयही त्यांनी घेतले.

Published on: Oct 04, 2025 02:52 PM