Uddhav Thackeray : ही बंडखोरी नाही तर हरामखोरी, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका

Uddhav Thackeray : ही बंडखोरी नाही तर हरामखोरी, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका

| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 10:22 PM

तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना दिलंय.

आता आदित्य फिरतोय, मी ही पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. त्यांना एक तर शिवसेना संपवायची आहे. ती संपवताना त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. ते बंडखोर नाहीत, हरामखोर आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना दिलंय. तसंच अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचं आयुष्य तुम्ही देणार आहात का? कोर्टावर माझा विश्वास आहे. पण आता त्यांनी निवडणूक आयोगाला सांगत आहेत आम्हीच खरी शिवसेना. आपल्याला एक गोष्ट करावी लागेल प्रत्येक पदाधिकाऱ्याचं शपथपत्र, प्रत्येक शिवसैनिकांची सदस्य नोंदणी, असा आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिलाय.

Published on: Jul 24, 2022 10:21 PM