Special Report | ब्रिटेनमध्ये ‘ओमिक्रॉन’चा ‘स्फोट’
कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन आता जगभरात हाहाकार माजवत आहे. त्याची भीषणता ब्रिटन आणि अमेरिकेत सर्वाधिक आहे. कोरोनाने ब्रिटनमधील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच वेळी, अमेरिकेत कोविडची प्रकरणे एका दिवसात दुप्पट झाली आहेत
कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन आता जगभरात हाहाकार माजवत आहे. त्याची भीषणता ब्रिटन आणि अमेरिकेत सर्वाधिक आहे. कोरोनाने ब्रिटनमधील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच वेळी, अमेरिकेत कोविडची प्रकरणे एका दिवसात दुप्पट झाली आहेत. बुधवारी 78,610 नवीन Omicron रुग्ण आढळल्याने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. तब्बल 12 महिन्यांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला 8 जानेवारी रोजी 68,053 रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली होती. सर्वकाही सुरळीत होऊ लागलं होतं. लॉकडाऊनदेखील शिथील करण्यात आला. मात्र ब्रिटनमध्ये आता पुन्हा एकदा या आजाराने थैमान घातलं आहे.
Published on: Dec 16, 2021 11:05 PM
