एकीकडे अमित शाहांचा कोल्हापूर दौरा, अंबाबाई मंदिराबाबत महत्वाचा निर्णय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा दक्षिण दरवाजा दुपारी बारा ते तीन या वेळेत बंद राहणार आहे. पाहा...
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी कोल्हापुरात विशेष तयारी करण्यात आली आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा दक्षिण दरवाजा दुपारी बारा ते तीन या वेळेत बंद राहणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे. अमित शाह दुपारी अंबाबाई दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अंबाबाई मंदिर परिसरात सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिराच्या आतील सर्व दुकानं सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिराचा परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात केली आहे. मंदिर परिसराची डॉग स्कॉडकडूनही तपासणी करण्यात आली आहे.
Published on: Feb 19, 2023 01:14 PM
