Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात ‘या’ जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत

Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात ‘या’ जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत

| Updated on: Mar 26, 2025 | 10:53 AM

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांसह गोवा राज्याला अचानक पावसाने झोडापल्याचे पाहायला मिळाले. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लावण्याने बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीमुळे शेतीचं नुकसान झाल्याने बळीराजा चिंतेत आला आहे. कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे. तर कोकणपट्ट्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रत्नागिरीसह सिंधूदुर्ग जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची दैना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सांगली जिल्ह्यात आज सकाळीच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा पाहायला मिळाला. तर साताऱ्यातील काशीळ परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे सोलापुरातील बार्शी येथे द्राक्ष आणि इतर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

Published on: Mar 26, 2025 10:53 AM