Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीची नणंद आरोपी करिष्मा हगवणेंचेही राजकीय संबंध? ‘या’ दोन महिला नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीची नणंद आरोपी करिष्मा हगवणेंचेही राजकीय संबंध? ‘या’ दोन महिला नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल

| Updated on: May 24, 2025 | 11:29 AM

पुण्यातील राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शंशाक आणि वैष्णवी यांच्या लग्नात हगवणे कुटुंबीयांनी ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि इतर अनेक वस्तू दिल्या होत्या. त्यानंतरही सुनेचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी वैष्णवीचा पती शंशाक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झालेले सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. अखेर त्यांना देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवी हगवणेचे सासरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत होते. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान वैष्णवी आणि शंशाक हगवणे यांच्या लग्नाला अजित पवार यांची उपस्थिती पाहायला मिळाल्यानंतर अजित पवारांवर देखील माध्यमांकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकऱणातील वैष्णवीची नणंद आरोपी करिष्मा हगवणे सोबत काही महिला मंत्र्यासोबतचे फोटो देखील आता व्हायरल होत आहे. यामध्ये मंत्री आदिती तटकरे आणि सुप्रिया सुळेंसोबतच आरोपी करिष्मा हगवणेचे फोटो समोर आले आहेत.

Published on: May 23, 2025 09:25 AM