Vaishnavi Hagawane Case : एकटी असताना मारहाण, चेहऱ्यावरून रक्त.. ते एकच कारण म्हणून मला….काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सूनेकडून पर्दाफाश, थेट दाखवले फोटो

Vaishnavi Hagawane Case : एकटी असताना मारहाण, चेहऱ्यावरून रक्त.. ते एकच कारण म्हणून मला….काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सूनेकडून पर्दाफाश, थेट दाखवले फोटो

| Updated on: May 24, 2025 | 11:31 AM

'मला मारहाण झाल्यावर मी पोलिसात तक्रार केली होती आणि आई व भावाला कळवलं होतं. माझे मिस्टर नसताना हे लोक यायचे आणि मला मारहाण करायचे आणि घरात कोंडून ठेवायचे. ' मोठ्या सुनेचा खळबळजनक आरोप काय?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आलेल्या राजेंद्र हागवणे यांच्या मोठे सुनेकडून हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना हगवणे यांच्या मोठ्या मयुरी जगताप हगवणे या नावाच्या सुनेकडून हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता हगवणे यांच्या मोठ्या सुनेने त्यांना मारहाण झाल्याचे फोटोच टीव्ही ९ मराठीवर दाखवले आहेत. यासह मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून मोठी सून मयुरीने जानेवारी महिन्यात पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. मात्र पुढे काहीही कारवाई करण्यात आली नव्हती. तर नोव्हेंबरमध्ये महिला आयोगाकडेही तक्रार केली होती असंही त्यांनी सांगितले आहे.

ती माझी जाऊ असून आम्ही कधी एकमेकांशी बोललो नाही. तिच्या मिस्टरांनी आणि माझ्या नणदेने आम्हाला एकमेकींशी कधी बोलू सुद्धी दिलं नाही. घरात तिला मारहाण व्हायची, त्रास व्हायचा हे माझ्या कानावर यायचं. पण तिचा नवरा मलाच येऊन मारायचा. त्यामुळे यात आम्ही काहीच करू शकत नव्हतो, असं मयुरी हगवणेंनी सांगितलं. तर जे चुकीचं आहे, त्याला मी विरोध करायचे त्यामुळे त्यांनी मला मारहाण केली. मी माझ्या मिस्टरांनाही सांगितलं. त्यानंतर आम्ही वेगळे राहत होते, असंही मयुरी हगवणे यांनी सांगितलं.

Published on: May 22, 2025 01:42 PM