Rajendra Hagawane : हगवणे कुटुंबाकडे 3 बंदुक परवाने; निलेश चव्हाणकडेही परवाना

Rajendra Hagawane : हगवणे कुटुंबाकडे 3 बंदुक परवाने; निलेश चव्हाणकडेही परवाना

| Updated on: May 23, 2025 | 1:48 PM

Vaishnavi Hagawane Case Update : वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी हगवणे कुटुंबाबद्दल आणखी एक खुलासा झाला आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. हुंड्यासाठी सुनेचा छळ करणाऱ्या हगणवे कुटुंबाकडे 3 बंदुकीचे परवाने असल्याचं आता समोर आलं आहे. निलेश चव्हाणकडे देखील बंदुकीचा परवाना आहे. निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असतानाही त्याला बंदूक परवाना देण्यात आलेला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे परवाने दिलेले असल्याचं समजत आहे.

वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी सासरकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर हगवणे कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर आले आहेत. पैशांसाठी हे कुटुंब आपल्या दोन्ही सूनांचा छळ करत होतं. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता. या प्रकरणानंतर अजित पवार यांनी तातडीने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Published on: May 23, 2025 01:48 PM